मविआने एसटी संपकऱ्यांचे पाणी तोडले

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करूनही एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरूच ठेवले. तसेच आंदोलन मागे घेतले नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. या कारवाईला महाविकास आघाडीकडून सुरूवात झाली आहे. संपकारी आंदोलकांचा आझाद मैदानातील पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई मविआने केली आहे. त्यामुळे आंदोलक कर्मचारी पाण्याविना बेहाल झाले आहेत. मविआ सरकारने […]

मविआने एसटी संपकऱ्यांचे पाणी तोडले

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करूनही एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरूच ठेवले. तसेच आंदोलन मागे घेतले नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. या कारवाईला महाविकास आघाडीकडून सुरूवात झाली आहे. संपकारी आंदोलकांचा आझाद मैदानातील पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई मविआने केली आहे. त्यामुळे आंदोलक कर्मचारी पाण्याविना बेहाल झाले आहेत. मविआ सरकारने कारवाईला सुरुवात केली असून एसटी संपकऱ्यांचे तोंडचे पाणी तोडल्यामुळे आता उद्याही संपकाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले तर त्यांच्यावर आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संपावर बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कर्मचारी मान्य करत आजपासून पुन्हा कामावर रुजू होतील असा विश्वास सरकारने व्यक्त केला. मात्र सरकारचा निर्णय अमान्य करत कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

विलिनीकरण होईपर्यंत वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. मात्र विलिनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा एसटी आंदोलनाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे याविरोधात अनिल परब यांनी कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांना इशारा दिला. अनिल परब म्हणाले, ‘आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू आणि त्यानंतर कठोर निर्णय घेऊ’, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

अनिल परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच विलिनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे परबांनी सांगितले. मात्र तरीही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एसटी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन अनिल परबांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number