राज्यातील महागाईमुळे सामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांच्या खिशाला जास्तीची कात्री लागत आहे. त्यामुळे राज्यातील वाढत्या महागाईमुळे महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाली असून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
जालनातील गांधी चमन चौकात शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर चुली ठेवत भाकरी भाजून महागाईचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिकदेखील मोठ्या संख्येने सहभागी होते. आंदोलनादरम्यान, शिवसैनिकांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने, पुण्यातील भापकर चौक परिसरात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. महागाईची अंत्ययात्रा आणि मुंडण करून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच वाढत्या महागाईविरोधात अमरावतीमध्ये काँग्रेसने थाली बजाब आंदोलन केले.