माता रुख्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पंढरपूर, २४ मे २०२३, प्रतिनिधी :  अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथील देवी रुख्मिणीची पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. गुरुवारी सायंकाळी टाळ – मृदुंगांच्या जयघोषात शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. देवीची पालखी घेऊन निघालेले हे वारकरी जवळपास दीड महिन्यांच्या प्रवासानंतर पंढरपूरात दाखल होतात. वारी दरम्यान पालखी ४२ गावी मुक्कामी राहते. शिवाय पालखी […]

माता रुख्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पंढरपूर, २४ मे २०२३, प्रतिनिधी :  अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथील देवी रुख्मिणीची पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. गुरुवारी सायंकाळी टाळ – मृदुंगांच्या जयघोषात शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

देवीची पालखी घेऊन निघालेले हे वारकरी जवळपास दीड महिन्यांच्या प्रवासानंतर पंढरपूरात दाखल होतात. वारी दरम्यान पालखी ४२ गावी मुक्कामी राहते. शिवाय पालखी ज्या गावी जाईल तेथे देखील स्वागतासाठी, दर्शनासाठी शेकडो भाविक येत असतात. या पालखीचं यंदाचं ४२९ वे वर्ष आहे. कौडण्यपूर हे रुक्मिणीचे माहेरघर आहे. त्यामुळे पंढरपूरला या पालखीचा विशेष मान तर आहेच शिवाय विदर्भाचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून कौडण्यापूरच्या रुक्मिणी मातेची ओळख आहे.

तीरथ महाराज बाराहाते, अशोक महाराज उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली देवी रुख्मिणीची पालखी सायंकाळी पाच वाजता अमरावती शहरात दाखल होणार आहे. अमरावतीतील बियाणी चौकात आमदार यशोमती ठाकूर यांच्या तर्फे पालखीचे जंगी स्वागत झाल्यावर इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक येथून पालखी एकवीर संस्थांनमध्ये मुक्कामासाठी राहील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number