Andheri Fire News : अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी इमारतीत अडकलेल्या नागरिकांचा आक्रोश

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील गावदेवी डोंगर परिसरातील एसआरए (SRA) इमारत क्रमांक 2 मध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. धुराने वेढलेल्या या निवासी इमारतीत अनेक रहिवासी अडकल्याने मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये, या बहुमजली इमारतीच्या खालच्या मजल्यांवरून पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या धुराचे प्रचंड लोट […]

Andheri Fire News : अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी इमारतीत अडकलेल्या नागरिकांचा आक्रोश

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील गावदेवी डोंगर परिसरातील एसआरए (SRA) इमारत क्रमांक 2 मध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. धुराने वेढलेल्या या निवासी इमारतीत अनेक रहिवासी अडकल्याने मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये, या बहुमजली इमारतीच्या खालच्या मजल्यांवरून पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या धुराचे प्रचंड लोट बाहेर पडताना दिसत आहेत. त्याचवेळी, घाबरलेले रहिवासी बाल्कनी आणि खिडक्यांमधून बाहेर डोकावून मदतीसाठी आर्त हाक मारताना दिसत आहेत.

हेही वाचा : FDA action on Milk: तुकाराम मुंढेंचा दूध माफियांना दणका; महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायासाठी नवी नियमावली; उल्लंघन केल्यास थेट 10 लाखांचा दंड

आगीच्या घटनेनंतर इमारतीत धूर वेगाने पसरल्याचे दिसून आले. ज्यामुळे अनेक रहिवासी वरच्या मजल्यांवर अडकून पडले. काही रहिवासी अरुंद कडांवर उभे असल्याचे आणि धुरापासून वाचण्यासाठी इमारतीच्या बाहेरील बाजूने चढण्याचा प्रयत्न करताना आढळून आले. तर आगीची तीव्रता वाढताच, आत अडकलेले रहिवासी मदतीसाठी किंचाळत आणि रडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, स्वतःचा जीव वाचवण्याच्या हताश प्रयत्नात काही लोकांनी इमारतीवरून खाली उड्या मारल्याचे समजते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून सतत पाऊस पडत असूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केले. संरक्षक गणवेश परिधान केलेले अग्निशमन दलाचे जवान इमारतीवर चढून तिथे अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यास मदत केली. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने अनेक रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले असून अखेरीस आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. अधिकाऱ्यांनी आगीचे कारण अद्याप निश्चित केले असून आगीमागच्या नेमक्या कारणाचा तपास केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number