पश्चिम रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई! कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे पूर्वेतील गरीब नगरवर हातोडा; 500 झोपड्या जमिनदोस्त

पश्चिम रेल्वेने वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगरमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली.

पश्चिम रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई! कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे पूर्वेतील गरीब नगरवर हातोडा; 500 झोपड्या जमिनदोस्त

मुंबई : पश्चिम रेल्वेने वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगरमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी ही मोहीम पालिका प्रशासन, पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणा यांच्या समन्वयाने राबवली जात आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “आजची ही कारवाई रेल्वे सुरक्षा, महत्त्वपूर्ण क्षमतावृद्धी आणि राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उच्च न्यायालयाने आमच्या बाजूने एक स्पष्ट, विशिष्ट आणि कठोर निकाल दिला आहे. या निकालानुसार पश्चिम रेल्वेला येथील सर्व बेकायदेशीर बांधकामे तात्काळ हटवावी लागतील. आम्हाला 100 झोपड्यांना सूट द्यावी लागेल. उर्वरित अंदाजे 500 झोपड्या तात्काळ हटवाव्या लागतील. या कारवाईसाठी 1000 हून अधिक अधिकारी येथे उपस्थित आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही पुढील चार महिन्यांत हा परिसर मोकळा आणि स्वच्छ करू. मूठभर बेकायदेशीर अतिक्रमणे संपूर्ण मुंबई शहराला ओलीस ठेवू शकत नाहीत.”

हेही वाचा : Pune Shocking Video : रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, धारदार हत्याराने सपासप वार आणि नंतर पुलावरून खाली फेकलं; व्हिडीओ व्हायरल

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number