जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भारताची माजी जगज्जेती बॉक्सर मेरी कॉमने इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत युवर्णपद पटकावले आहे. मेरीने आपल्या 48 किलो वजनी गटाच्या झुंजीत फिलिपिनो जॉसी गबुकोवर 4-1 अशी मात करत सुवर्णपदक पटकावले.
भारताच्या पुरुषांना मात्र महिलांप्रमाणे वर्चस्व राखता आले नाही. जागतिक आणि आशियाई पदक विजेत्या शिवा थापाला नमवणाऱ्या राष्ट्रीय विजेत्या मनीष कौशिकला सुवर्णपदक पटकावण्यासाठी ‘रिंग’मध्येही उतरावे लागले नाही.
त्याच्या फायनलमधील मंगोलियन प्रतिस्पर्धी बत्तूमर मिशील्ट याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो फायनलमध्ये सहभागी झाला नाही.