अंधश्रद्धेतून विवाहितेला हाडांच्या राखेचं पाणी पाजलं

पुणे-व्यवसायात प्रगती होत नसल्याने तसंच मुलबाळ होत नसल्याने विवाहितेला हाडांची पावडर खायला घातल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबडीची अघोरी पूजा करून ही राख पाण्यातून पिण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सासरच्या लोकांवर विवाहितेचा छळ तसेच नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा […]

अंधश्रद्धेतून विवाहितेला हाडांच्या राखेचं पाणी पाजलं

पुणे-व्यवसायात प्रगती होत नसल्याने तसंच मुलबाळ होत नसल्याने विवाहितेला हाडांची पावडर खायला घातल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबडीची अघोरी पूजा करून ही राख पाण्यातून पिण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सासरच्या लोकांवर विवाहितेचा छळ तसेच नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेच्या तक्रारीनंतर पती, सासू, सासरा, दीरावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगानंही या प्रकरणात दखल घेतली आहे. अमावास्येला स्मशानभूमी मध्ये नेऊन प्रेतांची हाडं आणि राख आपल्या घरी आणून पाण्यामध्ये ते आपल्याला प्यायला लावल्याचा गंभीर आरोप त्या महिलेनं केला आहे.

पुण्यामधील हा प्रकार अमानवीय आणि निंदनीय असून या प्रकरणाची दाखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी सिंह गड रोड पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तातडीने कार्यवाही करून आयोगाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number