Chhatrapati Sambhajinagar: ‘नवीन घर बांधायचंय, घरून 12 लाख आण; नाहीतर…’ माहेरी जाताच पूजाने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हतनूर येथे सासरच्या कथित छळामुळे 24 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: ‘नवीन घर बांधायचंय, घरून 12 लाख आण; नाहीतर…’ माहेरी जाताच पूजाने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर गावात एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरकडून होत असलेल्या कथित मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या 24 वर्षीय महिलेने माहेरी येऊन काही दिवसांतच आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत महिलेचे नाव पूजा उत्कर्ष गोटे असे असून तिचा विवाह 26 जानेवारी 2023 रोजी शिरेगाव येथील उत्कर्ष गोटे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही महिन्यांनंतर पती तसेच सासू-सासऱ्यांकडून तिचा मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून 12 लाख रुपये आणण्याची मागणी वारंवार केली जात होती. या कारणावरून पूजाला टोमणे मारणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि मानसिक दबाव टाकणे असे प्रकार सुरू होते. या सततच्या त्रासामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.

याच पार्श्वभूमीवर पूजा काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी हतनूर येथे आली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती गेल्या तीन दिवसांपासून माहेरी राहत होती. मात्र शुक्रवारी घरातील इतर सदस्य बाहेर असताना तिने घरातच साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर कन्नड ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

या प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार पती उत्कर्ष गोटे, सासू रंजना गोटे आणि सासरे दिगंबर गोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

या घटनेमुळे हतनूर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. विवाहानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणीला अशा प्रकारे जीवन संपवावे लागल्याने नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number