जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
लग्नासाठी बरेचजण उत्सुक असतात. त्यासाठी आपण नातेवाईकांत सांगतो किंवा एखाद्या वधू वर सूचक मंडळात नाव नोंदणी करतो. पण, सांगलीच्या तरुणांना अशा प्रकारची नाव नोंदणी चांगलीच भारी पडलीय.
सांगलीत लग्नास इच्छुक असणाऱ्या अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. राज किशोर कार्पोर्शन वधू वर सूचक या मंडळाने लग्न जमवून देण्याच्या नावाखाली ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या मंडळाने लग्न जूळवून देण्याच्या जाहिरातीही दिल्या होत्या. दरम्यान, सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.