निवासी डॉक्टरांचा संप मागे, मागण्या पुर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत

टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, विद्यावेतनाची प्रलंबित मागणी, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील निवासी डॉक्टर 7 ऑगस्टला संपावर गेले होते. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने हा संप करणार असल्याचे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने स्पष्ट केले होते. तर  निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. प्रशासनासोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे […]

  निवासी डॉक्टरांचा संप मागे, मागण्या पुर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत

टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, विद्यावेतनाची प्रलंबित मागणी, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील निवासी डॉक्टर 7 ऑगस्टला संपावर गेले होते. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने हा संप करणार असल्याचे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने स्पष्ट केले होते.

तर  निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. प्रशासनासोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. अकोला, लातूर आणि आंबेजोगाई इथल्या डॉक्टरांच थकित विद्यावेतन लवकरात लवकर देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे आज सकाळी 8 वाजेपासुन सेवेत रुजू होणार आहेत. उर्वरित मागण्या पुर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत प्रशासनाला देण्यात आली आहे तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार आहेत.

निवासी डॉक्टरांनी संप मागे

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत निवासी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भात बैठक पार पडली या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीत काही मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत.

या बैठकीमध्ये नागपूर लातूर अकोला आणि अंबेजोगाई येथील निवासी डॉक्टरांचे थकलेले विद्यावेतन लवकरात लवकर देण्याचे मान्य करण्यात आले. टी बी झालेल्या डॉक्टरांच्या सुट्टीची मागणी आणि प्रसूती रजा मान्य करण्यात आल्या आहेत.

तर येणाऱ्या 15 दिवसाच्या कॅबिनेटमध्ये विद्यावेतनवाढीची मागणी मांडली जाणार आणि 5 हजारांनी वाढेल. निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पुढच्या महिन्यापासून त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट केलें जाणार आहे.

राज्यातील पूरस्थिती आणि आजारांचा प्रादुर्भाव पाहता हा संप मागे घेण्यात आला. जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर 31 ऑगस्टला पुन्हा संप पुकारण्याचा इशारा मार्डकडून देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number