Marathwada weather update today : पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

Marathwada weather update today : हवामान विभागानं आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

Marathwada weather update today : पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

Marathwada weather update today : पुणे – राज्यात एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढलेली असतानाच काही भागांत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या भागांतील शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात ढगाळ वातावरण 
पुणे शहरातही आज पावसाची शक्यता असून तापमान २४ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण पुढील काही दिवसांत तापमान पुन्हा ४० अंशांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

हेही वाचा – वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर; निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंचा खळबळजनक दावा

कोकणात दमटपणा, मुंबईत पावसाचा शक्यता कमी 
कोकण आणि मुंबई परिसरात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पण पावसाची शक्यता कमी असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. 

हेही वाचा – आई नव्हे, वैरीण! प्रियकराच्या मदतीने मुलीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल

विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून उष्णतेची लाट जाणवणार आहे. नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात चढ-उतार
मराठवाड्याच्या काही भागांत दुपारच्या वेळी कडक उन्हाचा चटका बसत आहे. तर सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी परभणी (४१.६ C), संभाजीनगर (४०.८ C), बीड (४१.० C), नांदेड (४०.० C) आणि लातूर-धाराशिव (३९.० C) या ठिकाणी कमाल तापमानाची नोंद झाली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number