जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.
अकोला, बुलडाणा, वाशिम आणि जालनात अवकाळी पाऊस आणि गारपीट पडल्याचं पाहायला मिळालं.अ
कोल्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात गारपीटीसह जोरदार पावसानं हजेरी लावलीय. यामुळे कांदा, गहू, हरभरा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
तर, बुलडाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. चिखली, कालेगाव, डोंगर शेवळीत गारांचा पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं.
या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. वाशिम आणि जालनातही गारपीटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान या पावसामुळे वाशिम आणि जालन्यामध्ये दोघांचा बळी गेला.