मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता; शेतकऱ्यांना खबरदारीचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.  10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, शेतमालाची साठवणूक सुरक्षित ठिकाणी करावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गडचिरोली,गोंदिया, भंडारा, […]

मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता; शेतकऱ्यांना खबरदारीचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.  10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, शेतमालाची साठवणूक सुरक्षित ठिकाणी करावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गडचिरोली,गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा,नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याच्या शक्यतेसह या वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल.

13 फेब्रुवारी रोजी वादळवाऱ्याची तीव्रता कमी होईल तर 14 फेब्रुवारीपासून हवामान सर्वसाधारण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number