मराठी दिग्दर्शकाने करीना कपूरवर केली टिका

मुंबई, ७ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचे कलाकार हे नेहमी चर्चेत असतात. त्यांना पाहिल्यावर बऱ्याचदा चाहते अतिउत्साही होतात त्यामुळे चाहत्यांशी गैरवर्तन केल्यामुळे बऱ्याच कलाकारांना ट्रोल देखील केले जाते. या कलाकारांमध्ये अभिनेत्री करीना कपूर हिचे नाव आवर्जून घेतले जाते. नुकतेच करीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे, मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून […]

मराठी दिग्दर्शकाने करीना कपूरवर केली टिका

मुंबई, ७ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचे कलाकार हे नेहमी चर्चेत असतात. त्यांना पाहिल्यावर बऱ्याचदा चाहते अतिउत्साही होतात त्यामुळे चाहत्यांशी गैरवर्तन केल्यामुळे बऱ्याच कलाकारांना ट्रोल देखील केले जाते. या कलाकारांमध्ये अभिनेत्री करीना कपूर हिचे नाव आवर्जून घेतले जाते. नुकतेच करीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे,

मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून करीनाशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे.त्यामुळे समाज माध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे. करीनाने एका मराठी कलाकाराला कशी वागणूक दिली, याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि करीना कपूर हे एकदा एकाच विमानातून प्रवास करत होते. त्यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत टिळेकर यांनी करीनावर टीका केली.

काय म्हणाले टिळेकर ?

‘कुठं मूर्ती आणि कुठे करीना? नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला. ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाइटमध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाइटमधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते, दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते. पण काही चाहते करीना कपूरजवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते. तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करीनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला.’

‘8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्टवर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंगसाठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो. तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती. तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्यामागे धावत गेली. पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सीनसाठी नगण्य भूमिका केली होती. तरीदेखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच. पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेव्हा जनमानसात मिसळून, चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरंच तोड नाही,’ असं त्यांनी लिहिलं.” ही पोस्ट पाहून चर्चा रंगू लागल्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number