IPL2018चा अंतिम सामना मराठमोळ्या क्रीडाप्रेमींसाठी खास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई आयपीएल 2018ची धूम आता देशात सर्वत्र गाजत आहेत. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडाप्रेमींमध्ये आहे. मात्र क्रिकेटच्या मराठमोळ्या क्रीडाप्रेमींसाठी यंदाचा हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच आयपीएल 2018 क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी येत्या 27 मे रोजी होणा-या अंतिम सामन्याद्वारे  मिळणार आहे. तेसुद्धा अभिनेत्री माधुरी दीक्षित […]

IPL2018चा अंतिम सामना मराठमोळ्या क्रीडाप्रेमींसाठी खास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आयपीएल 2018ची धूम आता देशात सर्वत्र गाजत आहेत. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडाप्रेमींमध्ये आहे. मात्र क्रिकेटच्या मराठमोळ्या क्रीडाप्रेमींसाठी यंदाचा हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे.

कारण पहिल्यांदाच आयपीएल 2018 क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी येत्या 27 मे रोजी होणा-या अंतिम सामन्याद्वारे  मिळणार आहे. तेसुद्धा अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी सोबत.

27 मे रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आस्वाद प्रेक्षकांना पुरेपूर घेता येणार आहे. 

विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहेत. संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार आहे.

#IPL2018 ‘चैन्नई सुपरकिंग्ज’ अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी…

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number