मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मराठीतील प्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेजचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. विकासला त्याच्या मित्रांनी मीरारोड येथील रुग्णालयात दाखल केले आहे.  बेताची परिस्थिती असल्याने ब्रेन हॅमरेजसारख्या आजारावर उपचारासाठी पैसे नसल्याने विकासचे कुटुंबीय चिंतेत आहेत. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था […]

मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेजचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. विकासला त्याच्या मित्रांनी मीरारोड येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

 बेताची परिस्थिती असल्याने ब्रेन हॅमरेजसारख्या आजारावर उपचारासाठी पैसे नसल्याने विकासचे कुटुंबीय चिंतेत आहेत. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य-सिनेसृष्टीतील लोकांनी पुढे यावे असे आवाहन त्याच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. इच्छुकांनी आपल्या परिने मदतीचा हात पुढे करावा असे विकासच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number