मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही; केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचा शिवसेनेचा दावा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही असं निक्षून सांगितल्याचा दावा शिवसेनेनं केलांय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे अरविंद सावंत, राहूल शेवाळे आणि श्रीरंग बारणे या खासदारांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीचे […]

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही; केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचा शिवसेनेचा दावा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही असं निक्षून सांगितल्याचा दावा शिवसेनेनं केलांय.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे अरविंद सावंत, राहूल शेवाळे आणि श्रीरंग बारणे या खासदारांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन सादर केले.

मात्र, राजनाथ सिंह यांनी या निवेदनावर असमर्थता दर्शवली. जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य ३० भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल. त्यामुळे हे शक्य नसल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचे शिवसेनेचे खासदारांनी सांगितलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number