Sayaji Shinde Post On Marathi Manoos : ‘वेळ आली आहे मराठी माणसानं खडबडून जागं होण्याची’; मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ पोस्ट

मुंबई : मुंबईतील मराठी माणसाचा टक्का हळूहळू कमी होत चालला आहे. आता वरवरची वाटत असलेली ही समस्या किती गंभीर आहे. अशा आशयाचा व्हिडिओ अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केला आहे. हा काळ आहे २०५२ चा जेव्हा प्राणीसंग्रहालयात आलेले पर्यटक इतर प्राण्यांसोबतच एकेकाळी अस्तित्वात असलेला मराठी माणूसदेखील पिंजऱ्यात पाहतील. अभिनेते भरत जाधव यांनी पिंजऱ्यातील त्या […]

Sayaji Shinde Post On Marathi Manoos : ‘वेळ आली आहे मराठी माणसानं खडबडून जागं होण्याची’; मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ पोस्ट

मुंबई : मुंबईतील मराठी माणसाचा टक्का हळूहळू कमी होत चालला आहे. आता वरवरची वाटत असलेली ही समस्या किती गंभीर आहे. अशा आशयाचा व्हिडिओ अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केला आहे. हा काळ आहे २०५२ चा जेव्हा प्राणीसंग्रहालयात आलेले पर्यटक इतर प्राण्यांसोबतच एकेकाळी अस्तित्वात असलेला मराठी माणूसदेखील पिंजऱ्यात पाहतील. अभिनेते भरत जाधव यांनी पिंजऱ्यातील त्या मराठी माणसाची भूमिका मांडली आहे. सध्याच्या प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिली आहे. 

हेही वाचा : Saree Sale Offer : महिलांची एकच गर्दी, परिणामी चेंगराचेंगरी, काही महिला बेशुद्ध…; साडी खरेदीला आलेल्या महिलांना आवरणं झालं कठिण

मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होण्यासाठी स्वतःच जबाबदार असल्याचं या व्हिडिओत म्हटलं आहे. आम्हाला मराठी म्हणवून घ्यायची लाज वाटली आणि मराठी माणसाचा टक्का घसरला, असेही यात नमूद केले आहे. सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार मराठी माणसाला सावध केल्याचा व्हिडिओदेखील यात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सयाजी शिंदे, भरत जाधव या कलाकारांनी आता मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लोकजागृती करत असल्याचे या पोस्टमधून पाहायला मिळत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number