मराठा आरक्षण : सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गेल्या आठवड्याभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला दिसत आहे. मराठा समाजाने आरक्षणाच्या आंदोलनाची धग कायम ठेवली असून लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशीही आग्रही मागणी होते आहे.  याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी […]

मराठा आरक्षण : सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या आठवड्याभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला दिसत आहे. मराठा समाजाने आरक्षणाच्या आंदोलनाची धग कायम ठेवली असून लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशीही आग्रही मागणी होते आहे. 

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणावर या सगळ्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेतले जाणार आहे. तसेच या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल याचीही चर्चा केली जाणार आहे.

काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. विधान भवनात ही बैठक दुपारी २ वाजता होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

मराठा समाजाच्या अहवालबाबत भेटीगाठी – 

भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, बबनराव लोणीकर व आ.आशिष शेलार यांनी शुक्रवारी राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा,यासाठी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती म.जी.गायकवाड यांची भेट घेऊन तसे निवेदन सादर केले.

शिवसेना नेत्यांना वगळलं –

मात्र, या शिष्टमंडळात शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा समावेश नव्हता. मराठा समाजासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे सदस्य मंत्री एकनाथ शिंदे हे असूनही त्यांना या भेटीपासून दूर ठेवण्यात आले. या भेटीनंतर आयोगाकडे मराठा आरक्षणासंदर्भात १ लाख ८७ हजार निवेदने आली आहेत. सर्व बाबींचा अभ्यास करून अहवाल लवकरात लवकर देण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे गायकवाड यांनी म्हटले असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले

आजच्या बैठकीत नेमके काय होणार? 

  • मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
  • सभापती, अध्यक्ष यांच्यासहित सर्व गटनेत्यांची बैठक पार पडणार आहे.
  • वेगवेगळ्या संघटना या आंदोलनात कार्यरत आहेत त्यांच्याशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.
  • त्या सर्वांना चर्चेसाठी बोलवण्यात येणार असून तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा….

मराठी तरूणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये – राज ठाकरे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांचा जलसमाधी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number