जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोग सर्वेक्षण करणार आहे.
पुण्यात याबाबत निवृत्त न्यायमुर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्य मागासवर्गीय आयोगाला जे अहवाल देण्यात आले त्यावर चर्चा झालीय.
न्यायालयात सादर केलेल्या बाबी सरकारकडून राज्य मागासवर्गीय आयोगाला सादर करण्यात आल्यात. या बाबी पडताळून पाहण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय आठ सदस्यीय आयोगानं घेतलाय.
यावेळी आयोगाने आरक्षणाच्या मागणी संदर्भात नव्या निकषांनुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.