मेधा खोलेंच्या अटकेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यात निर्मला यादव यांनी खोटे नाव सांगून सोवळ्याचे जेवण केल्याप्रकरणी डॉ. मेधा खोले यांनी तक्रार दाखल केली होती. अनेक आरोपांनंतर खोले यांनी तक्रार मागे घेतली. मात्र, निर्मला यादव यांनी खोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.   ‘सोवळं’प्रकरणी मेधा खोलेंच्या अटकेसाठी मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन होणार आहे. हा मोर्चा मूक मोर्चा […]

मेधा खोलेंच्या अटकेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यात निर्मला यादव यांनी खोटे नाव सांगून सोवळ्याचे जेवण केल्याप्रकरणी डॉ. मेधा खोले यांनी तक्रार दाखल केली होती. अनेक आरोपांनंतर खोले यांनी तक्रार मागे घेतली. मात्र, निर्मला यादव यांनी खोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

‘सोवळं’प्रकरणी मेधा खोलेंच्या अटकेसाठी मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन होणार आहे. हा मोर्चा मूक मोर्चा नसून 25 सप्टेंबरला पुण्यात निषेध काढणार असल्याची माहिती मिळते आहे. 

 

निर्मला यादव यांनी माझ्याविरोधात तक्रारीनंतर मला मानसिक त्रास झाला असल्याचे सांगितले. मी मोलकरीण नाही, माझा केटरिंगचा व्यवसाय असल्याचे सांगत त्यांनी वडील स्वातंत्र्यसैनिक, पती राष्ट्रसेवा दलात, असल्यामुळे जात-पात मानण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

25 सप्टेंबरला होणाऱ्या या मोर्चात बहुजन संघटना आणि पुरोगामी संघटनांनाही मोर्चात सहभागी करणार असून लाल महाल ते पोलीस आयुक्तालय दरम्यान हा मोर्चा निघणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number