जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
9 ऑगस्टला मुंबईच मराठा क्रांती महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बाईक रॅली काढण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मोर्चे काढत आहे. संपूर्ण राज्यभरातून आतापर्यंत 57 मोर्चे निघालेत.
दरम्यान, मुंबईतही बाईक रॅलीच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन या बाईक रॅलीमार्फत केलं जात आहे.