जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र एटीएसने नक्षली संघटनेशी संबंधित असणाऱ्या 7 संशयितांना अटक केलीय.
अटक केलेले सर्व माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित असल्याचा एसटीएसला संशय आहे. या संशयाच्या आधारे एटीएसनं या माओवाद्यांना अटक केली असून कोरेगाव-भीमा हिंसारातत या माओवाद्यांचा हात असल्याचा संशयही एटीएसला आहे.
या संघटनेवर बंदी घालण्यात आलीय. दरम्यान या संशयित आरोपींची रवानगी 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय.