‘अनेक आमदारांना माघारी यायचं आहे’

कराड, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. महिनाभरापूर्वी शरद पवारांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राष्ट्रवादीत वातावरण चांगलेच तापले होते. रविवारी अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय घडामोडींना […]

‘अनेक आमदारांना माघारी यायचं आहे’

कराड, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. महिनाभरापूर्वी शरद पवारांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राष्ट्रवादीत वातावरण चांगलेच तापले होते. रविवारी अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कराडमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी कराडमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देत शक्तीप्रदर्शन केले.

आम्हाला माघारी यायचं आहे अनेकांचा फोन !
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कराड येथे एक गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना अनेकांचा फोन आला. आम्हाला माघारी यायचं आहे, असं अनेक आमदारांनी सांगितले असून, दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असं देशमुख यांनी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number