जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने आज दुपारी साऱ्यांच्याच ह्रद्याचे ठोके चुकवले. मंत्रालयापासून ते तो राहत असलेल्या उस्मानाबादपर्यंत. सगळीकडे एक तणाव पसरला.
ज्ञानेश्वर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकरांना मंत्रालयात भेटायला गेला होता. तिथे तोनंतर थेट सातव्या मजल्याच्या खिडकीबाहेर गेला. सुरक्षारक्षकाला वाटलं की तो एसी मेकॅनिक आहे त्यांनी ज्ञानेश्वरला सोडलं. पुढे जे घडायचं ते घडलं. मात्र सर्वांचाच जीव टांगणीला लागला. आता सर्वांनाच एक प्रश्न सतावतोय.
मंत्रालयात ज्ञानेश्वरला जीव धोक्यात का टाकावा लागला? त्याला जीव धोक्यात टाकायला कुणी भाग पाडलं? परिस्थितीनं की आणखी कशानं. सातव्या माळ्याच्या खिडकीबाहेर ज्ञानेश्वर पोहचला. त्याने जीव धोक्यात घातला. सुदैवाने वेळीच हालचाल झाली त्याला वाचवलंही गेलं.
मात्र, मुळात तो जीव धोक्यात टाकण्यासाठी तेथे का पोहचला? जाणकारांचं म्हणणं असं आहे की चौकशीची गरज आहे की सरकारी निबरपणाची. मंत्रालयातील परिस्थिती अशी आहे का? की तिनं ज्ञानेश्वरला जीव धोक्यात टाकायला भाग पाडलं?