मान्सून १० जूनला मुंबईत दाखल?

मान्सूनचे आगमन ३१ मेदरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईत होऊ शकते.

मान्सून १० जूनला मुंबईत दाखल?

मुंबई : मान्सून प्रगतिपथावर असून निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सूनने हिश्शाने काबीज केले आहे. मान्सूनचे आगमन ३१ मेदरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते. मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी लगतच्या जिल्ह्यांत, मध्य महाराष्ट्र खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number