‘वाट बघतोय रिक्षावाला’,’बाई वाड्यावर या’ हे गाणं आठवतंय का? हे सुपरहिट गाणे अजूनही लोक आवर्जून ऐकतात. यातील मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या खाजगी आयुष्यामुळे अलीकडेच बरीच चर्चेत होती. अशातच या सगळ्यातून सावरत तिने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. मानसीने आपले स्वतःचे नवे घर घेतले आहे. तिने नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा व्हीडीओ शेअर केल्यावर तिने त्याला कॅप्शन दिले की,”प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वत:चं एक तरी घर असावं. जिथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं. दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं. या धावपळीच्या जगण्यात वावरताना मायेची उब देणारं डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं. माझी ऊर्जा स्थान बनले माझं नवीन घर, मांगल्याचे दुसरे रुप असते… एक घरसंस्काराची शिदोरी असते एक घर, माझे घर”.
मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओखाली बऱ्याच कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्री मानसी नाईकला अलीकडच्या काळात बर्याच अडीअडचणींना सामोरे जावे लागले. यातून स्वतःला सावरत तिने अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसीने नव्या घरात प्रवेश केला.