मनोज पांडे देशाचे नवे सैन्यदल प्रमुख

भारताचे नवीन सैन्यदल प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज नरवणे यांच्यानंतर मनोज पांडे यांची सैन्यदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे एप्रिल महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता लेफ्टनंट जनरल मनोज यांची सैन्यदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्या आली आहे. मनोज नरवणे […]

मनोज पांडे देशाचे नवे सैन्यदल प्रमुख

भारताचे नवीन सैन्यदल प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज नरवणे यांच्यानंतर मनोज पांडे यांची सैन्यदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे एप्रिल महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता लेफ्टनंट जनरल मनोज यांची सैन्यदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्या आली आहे.

मनोज नरवणे यांच्यानंतर लेप्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील वरिष्ठ अधिकारी आहे. तसेच मनोज पांडे यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाणार आहे.

मनोज पांडे यांची लष्करी कारकिर्द

३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारीही मनोज पांडे यांनी सांभाळली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number