जालना : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस आहे. सरसकट सर्वच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे. हैदराबादसह तिन्हीही गॅझेट लागू करा. हैदराबादहून आणलेले पुरावे लगेच लागू करावेत, सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेश कायद्यात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले असून रविवारी त्याच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषण सुरू होऊन २४ तास उलटून गेले आहेत. अद्यापही सरकारने यावर कोणताही निर्णय घेतला नाही तसेच सरकारकडून जरांगे यांची भेट कोणी घेतली नाही. रविवारी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. रविवारी सरकारकडून मनोज जरांगेची भेटली घेतली जाणार का? आणि
सरकार काही निर्णय घेतं का ते पाहावा लागणारं आहे?