Manoj Jarange Patil : कंठ दाटला, डोळ्यात अश्रू… उपोषणाला जाताना मनोज जरांगे भावूक

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातून मराठा समाजाची हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. मनोज जरांगें पाटील उपोषणाला बसण्यासाठी उपोषण स्थळाकडे पायी रवाना झाले आहेत.

Manoj Jarange Patil : कंठ दाटला, डोळ्यात अश्रू… उपोषणाला जाताना मनोज जरांगे भावूक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. काल जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली मात्र या चर्चेत जरांगे यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे जरांगेंनी आमरण उपोषण करण्यावर ठाम भूमिका घेतली. जरांगे यांच्या सोबत राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर विखे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत एक लेखी पत्र राज्य सरकार कडून सोपवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पत्रातील तपशील कळू शकलेला नाही. त्यामुळे जरांगे यांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. 

हेही वाचा- Sunil Tatkare : विधानपरिषदेच्या जागेसाठी तटकरेंची फिल्डिंग, एकनाथ शिंदेंची भेट घेत मांडला महत्त्वाचा विषय; रायगड पालकमंत्रीपदाचाही तिढा सुटणार?

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातून मराठा समाजाची हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी भावनिक विनंती आता मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. दरम्यान मनोज जरांगें पाटील उपोषणाला बसण्यासाठी उपोषण स्थळाकडे पायी रवाना झाले आहे. 

यावेळी जरांगे पाटील उपोषणा स्थळाकडे जात असताना भावूक झाले आणि मनोज जरांगें यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले. आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आता सुरू झाले असून स्वतः जरांगे पाटील यांनी उपोषणा शेजारी एक रिंगण आखले आहे. या रिंगणाच्या आत मधी कोणीही बांधवांनी येऊ नये असं आव्हान त्यांनी केलेला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान मंत्री विखे पाटील देखील अंतरवली सराटीकडे जाण्यासाठी निघाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number