जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालीय. तसंच मनोहर जोशी, सधीर जोशी यांचं नेतेपद कायम आहे.
शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत अधिकृत घोषणा झालीय. सेना नेतेपदी आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय.
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडऴात येणार असल्याने मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांना अष्टप्रधान मंडळातुन डच्चू मिळणार असुन त्यांना सल्लागार म्हणुन नेमलं जाणार असल्याची चर्चा होती.