PM Narendra Modi: "2025 हे अभिमान, एकता आणि शौर्याचे वर्ष" नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 129व्या भागात 2025 मधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ला राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगितले.

PM Narendra Modi:  &quot2025 हे अभिमान, एकता आणि शौर्याचे वर्ष" नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या 129व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला. 2026 हे नवे वर्ष जवळ येत असताना, पंतप्रधानांनी 2025 मधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला आणि देशाला अभिमान व एकतेची भावना देणाऱ्या क्षणांवर प्रकाश टाकला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मन की बात दरम्यान 2025 मधील अनेक आठवणी त्यांच्या मनात ताज्या झाल्या आहेत. या वर्षात देशाने अनेक चर्चा, निर्णय आणि यशस्वी टप्पे अनुभवले, ज्यामुळे भारताची दिशा अधिक आत्मविश्वासपूर्ण झाली. “2025 हे वर्ष देशवासियांना अभिमान वाटावा असे होते,” असे त्यांनी नमूद केले.

या भाषणाचा केंद्रबिंदू ऑपेरेशन सिंदूर  होता. पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. “आजचा भारत आपल्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड करत नाही, हे जगाने स्पष्टपणे पाहिले,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

हेही वाचा: Domivli Water Cut: डोंबिवलीच्या अमृत योजनेला गळतीचे ग्रहण; 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद, कारण काय?

ऑपरेशन सिंदूरदरम्यान देशभरातून आणि परदेशातूनही मातृभूमीप्रती प्रेम, निष्ठा आणि समर्पण व्यक्त करणारी वस्तुस्थिती समोर आली, असे पंतप्रधानांनी सांगितले. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनीही या काळात देशाबद्दलची आपुलकी आणि एकजूट दाखवली, ही बाब देशासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी या भावनेची तुलना वंदे मातरमच्या 150व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दिसून आलेल्या देशभक्तीशी केली.

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात संपूर्ण देशात देशप्रेमाची जी लाट उसळली, ती राष्ट्रीय एकतेला अधिक बळ देणारी होती, असे ते म्हणाले. आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी सांगितले की, 2025 मधील हे सामूहिक अनुभव भारताच्या भविष्यासाठी प्रेरणास्थान ठरणार आहेत. अभिमान, एकता आणि राष्ट्राप्रती बांधिलकीची भावना 2026 मध्येही देशाला पुढे नेण्याचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑपेरेशन  सिंदूर  ही कारवाई 7 मे 2025 रोजी राबवण्यात आली होती. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, पाकिस्तान आणि Pakistan-occupied Kashmir (PoK) मधील दहशतवादी तळांवर ही निर्णायक लष्करी कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा: Bandu Aandekar: बेड्या घातलेल्या हातांनी अर्ज भरला, पण फॉर्म वरील रकाने रिकामेच राहिले; आंदेकरचा 'पॉवर शो' प्रशासनाने रोखला? वाचा सविस्तर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number