जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली होती. त्यामुळे तिच्या शरिरावर खुणा असल्याचा अजब युक्तिवाद पोलिसांनी उच्च
न्यायालयात केला.
मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी प्रदीप भालेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीच्या वेळी ‘बाथरुममध्ये घसरुन पडल्यामुळे मंजुळाच्या
अंगावर खुणा होत्या’ असा अजब दावा पोलिसांनी उच्च न्यायालयात केला.
तर, पोलिसांचा हा अजब दावा ऐकून उच्च न्यायालयाने पोलिसांनी चांगलंच झापले. इतर प्रकरणातही दोषींना वाचवण्यासाठी अशीच मदत करता का?’ असा थेट सवालही
क्राईम ब्रांचला विचारण्यात आला.