मांडूळ सापाची गुप्तधनासाठी पूजा करून हत्या केल्याची घटना लातूरमध्ये समोर आली आहे.
पूजा केलेल्या मृत मांडूळचे अवशेष सापडले आहेत, मांडुळ हा दुर्मीळ साप असल्याने त्याची किंमत लाखोंच्या घरात असते.
पैशासाठी मोठ्या प्रमाणात मांडूळाची तस्करी केली जाते, त्याचप्रमाणे या सापाची मदत गुप्तधन शोधण्यासाठी होते, अशी अंधश्रद्धा समाजात रूढ आहे.
लातूरात सापडलेल्या या सापाच्या शेपटीला आणि तोंडाला हळद-कुंकू लावलेले आढळले.
दुर्मिळ होत चालेला हा साप गैरसमजात आणि अंधश्रद्धेमुळे मारला जात आहे.
सापाला मारून गुप्तधनाचा शोध घेता येत नाही अशा अनेक अंधश्रद्धा दुर करण्यासाठी अनेक सर्पमित्र काम करत आहेत, मात्र तरीही असे प्रकार अजूनही घडतच आहेत.