काळ आला पण वेळ आली नव्हती…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   चालत्या ट्रेन मध्ये चढु नये अशा घोषणा सततच रेल्वे स्थानकांत केल्या जात असतात. मात्र बरेचसे प्रवासी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता कुर्ला रेल्वे स्थानकात असाच प्रकार घडला आणि आणि प्लॅटफॉर्मवर उपस्थीत लोकांना ही थरारक दृष्ये पहायला मिळाली.   संध्याकाळी 5 वाजुन 8 मिनीटांच्या कल्याणला जाणाऱ्या चालत्या लोकलमध्ये […]

काळ आला पण वेळ आली नव्हती…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चालत्या ट्रेन मध्ये चढु नये अशा घोषणा सततच रेल्वे स्थानकांत केल्या जात असतात. मात्र बरेचसे प्रवासी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता कुर्ला रेल्वे स्थानकात असाच प्रकार घडला आणि आणि प्लॅटफॉर्मवर उपस्थीत लोकांना ही थरारक दृष्ये पहायला मिळाली.

 

संध्याकाळी 5 वाजुन 8 मिनीटांच्या कल्याणला जाणाऱ्या चालत्या लोकलमध्ये एका माणसाने चढण्याच्या प्रयत्न केला. पण त्याचा तोल जाउन तो प्लॅटफॉर्म वरुन चालु लोकल मधुन फरपटत पुढे गेला.

 

चालकाने प्रसंगावधान राखुन लोकल थांबवली. व सुदैवाने त्याचा जीव वाचला. दरम्यान, स्थानकातील थरारक दृष्ये सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number