‘तो’ देवदूतासारखा आला अन् त्याने अनेकांचे प्राण वाचवले

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 निरपराधांचे बळी गेले. असंख्य स्वप्न आपल्या डोळ्यात भरलेले तरुण तरुणी याठिकाणी मौज मस्ती करण्यासाठी आले होते. आणि ही मौज मस्ती काही क्षणातच आक्रोशात बदलली. या अग्नितांडवात  देवासारखा धावून आला तो म्हणजे महेश साबळे. महेश साबळे या लिंक रुम मध्ये सिक्युरिटीचे काम करणाऱ्या मुलाने कमला […]

‘तो’ देवदूतासारखा आला अन् त्याने अनेकांचे प्राण वाचवले
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 निरपराधांचे बळी गेले. असंख्य स्वप्न आपल्या डोळ्यात भरलेले तरुण तरुणी याठिकाणी मौज मस्ती करण्यासाठी आले होते. आणि ही मौज मस्ती काही क्षणातच आक्रोशात बदलली. या अग्नितांडवात  देवासारखा धावून आला तो म्हणजे महेश साबळे. महेश साबळे या लिंक रुम मध्ये सिक्युरिटीचे काम करणाऱ्या मुलाने कमला मिलच्या आगीत अडकलेल्या 100 हुन अधिक जणांचे प्राण वाचवले आहे. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी पब मध्ये असलेल्या लोकांच्या आवाजाने महेश मदतीसाठी धावत गेला. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी पब मध्ये असलेल्या लोकांच्या आवाजाने महेश मदतीसाठी धावत गेला. या अग्नितांडवात देवासारखा धावून आला तो म्हणजे महेश साबळे.

त्यावेळी अनेकांना बाहेर जाण्याचा दरवाजा कोठे आहे ही माहित नव्हतं. अनेक बाहेर जाण्याचे दरवाजे बंद करून ठेवले होते. मात्र, महेशने दरवाजा तोडून अडकलेल्यांना बाहेर काढले आणि त्या लोकांचे प्राण वाचवले.

तर, यामध्ये मुंबई पोलीसही अव्वल ठरले. मुंबई पोलिसातील बहाद्दर शिपाई सुदर्शन शिंदेंनी कमला मिल कंपाऊंडमधील आगीतून तीन जणांना बाहेर काढले. जीवावर उदार होत त्यांनी तिघांचे प्राण वाचवले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number