पत्नीसाठी घेतलेलं गिफ्ट जेव्हा पती ट्रेनमध्ये विसरतो….

बायकोसाठी आणलेलं एखादं स्पेशल गिफ्ट जर तिला देण्यापूर्वीच नवऱ्याने हरवलं तर?… त्या नवऱ्यावर काय प्रसंग बेतेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. अशावेळी जर कुणी ते गिफ्ट तुम्हाला परत मिळवून तुम्हाला वाचवू शकलं, तर ती व्यक्ती तुमच्यासाठी एखाद्या देवदुतापेक्षा कमी नसेल. ठाकुर्ली येथे राहाणाऱ्या सागर मवानी यांच्यासोबत अशीच घटना घडली. आपल्या बायकोला सरप्राइज देण्यासाठी त्यांनी एक […]

पत्नीसाठी घेतलेलं गिफ्ट जेव्हा पती ट्रेनमध्ये विसरतो….

बायकोसाठी आणलेलं एखादं स्पेशल गिफ्ट जर तिला देण्यापूर्वीच नवऱ्याने हरवलं तर?… त्या नवऱ्यावर काय प्रसंग बेतेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. अशावेळी जर कुणी ते गिफ्ट तुम्हाला परत मिळवून तुम्हाला वाचवू शकलं, तर ती व्यक्ती तुमच्यासाठी एखाद्या देवदुतापेक्षा कमी नसेल. ठाकुर्ली येथे राहाणाऱ्या सागर मवानी यांच्यासोबत अशीच घटना घडली. आपल्या बायकोला सरप्राइज देण्यासाठी त्यांनी एक गिफ्ट खरेदी केलं. मात्र रेल्वेचा प्रवास करून उतरल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपण ते स्पेशल गिफ्ट ट्रेनमध्येच विसरून गेलो. यावर सागर यांना कळेना की गिफ्ट मिळवायचे कसे? आधी त्यांनी RPF हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. पण तेथे काही प्रतिसाद मिळाला नाही. मग सागरने थेट सेंट्रल रेल्वेला ट्विट केलं.

 

मी विद्याविहारहून कल्याण लोकलमध्ये बसलो आणि ठाकुर्लीला उतरलो. मात्र माझ्या हातात एक गिफ्टची पिशवी होती ज्यावर सलोनीअसं लिहिलं होतं. ती पिशवी मी लोकल ट्रेनमध्येच विसरलोय. कल्याणकडे जाणाऱ्या चौथ्या डब्यात मी बसलो होतो. मी जी बॅग विसरलो, त्यात पत्नीसाठी घेतलेली मौल्यवान भेट होती. मला ती परत मिळू शकेल का?” असं ट्विट सागरने केलं.

गंमत म्हणजे सागर यांनी काकुळतीला येऊन केलेल्या ट्विटची दखल सेंट्रल रेल्वेने घेतली आणि तातडीने रिप्लाय करत RPF ने सागर यांना मदत करावी, असं सांगण्यात आलं. त्यानंतर काही वेळातच सागर यांना ते विसरून गेलेली बॅग मिळाली, आणि त्यासोबतच त्यांनी आपल्या पत्नीसाठी घेतलेलं सरप्राइज गिफ्टही त्यांना मिळालं.

 

गिफ्ट मिळाल्यावर पुन्हा एकदा ट्विट करत त्यांनी मध्य रेल्वेचे आभार मानले. रेल्वेच्या तत्परतेचे आभार मानताना अखेर आता मला रात्री जेवायला मिळेलअसंही गमतीने म्हटलं आहे.

 

या ट्विटला या प्रतिक्रिया देत तुम्हाला आनंदी पाहून आनंद झालाअसं छानसं ट्विटही मध्य रेल्वेतर्फे करण्यात आलं.

 

दरम्यान पत्नीसाठी आणलेलं गिफ्ट विसरण्यावरून केलेल्या ट्विटवर अनेकांनी विनोदी प्रतिक्रियाही दिल्या.

 

एरवी मध्य रेल्वेला प्रवासी कायम नावं ठेवत असतात. मात्र या घटनेने मध्य रेल्वेने या सागरचे मन जिंकले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number