वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाणीपुरी म्हटंले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र पाणीपुरीचा आस्वाद घेत असताना एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. कानपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
नरेश कुमार सचान असे या व्यक्तीचे नाव असून पाणीपुरी खात असताना यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नरेश कुमार सचान हे पाणीपुरी खाण्यासाठी गेले असता. पाणीपुरी खात असतावेळी त्यांना खोकला लागला आणि खोकत असताना ते खाली पडले आणि बेहोश झाले. आणि लोकांनी त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल.