अपंगांच्या डब्यात महिलेला मारहाण, कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ठाण्याहून दादरकडे निघालेल्या लोकलमधील अपंग डब्यात विचित्र प्रकार घडलाय. अपंग डब्यात प्रवास करणाऱ्या महिलेला मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या इसमाने प्रचंड मारहाण केलीय. रफिक अली शेख असे या इसमाचे नाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे घटनास्थळी इतरही प्रवासी होते, परंतु कोणीही त्या महिलेच्या मदतीस धावून आले नाही. विशेष म्हणजे शेजारच्या डब्यातील पोलिसानेदेखील याकडे दुर्लक्ष […]

अपंगांच्या डब्यात महिलेला मारहाण, कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठाण्याहून दादरकडे निघालेल्या लोकलमधील अपंग डब्यात विचित्र प्रकार घडलाय. अपंग डब्यात प्रवास करणाऱ्या महिलेला मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या इसमाने प्रचंड मारहाण केलीय. रफिक अली शेख असे या इसमाचे नाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे घटनास्थळी इतरही प्रवासी होते, परंतु कोणीही त्या महिलेच्या मदतीस धावून आले नाही. विशेष म्हणजे शेजारच्या डब्यातील पोलिसानेदेखील याकडे दुर्लक्ष केले. त्यातील एका प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून दादर जीआरपी पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केली आहे. आरोपी रफिक अली आणि पीडित महिला काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रफिकने पीडित महिला नाजीयाकडून जवळपास 1 लाख रुपये घेतले होते. नाजीयाने पैशांची मागणी केली असता रफिक टाळटाळ करत होता. अखेर गुरुवारी रात्री रफिकने महिलेला चालत्या लोकलमध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. पुढे दादर रेल्वे स्टेशनवरील पोलिसांनी आरोपी रफिकला ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number