जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
साडी घालून भरधाव मोटार सायकल चालवणाऱ्या एका व्यक्तीला लोकांनी बेधुंद चोपून काढल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील डोणगाव
येथे घडली आहे. साडी घालून फिरणाऱ्या रमेश चांगदेव थोरेला वीरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. स्त्री वेशातील एक व्यक्ती
भरधाव वेगाने मोटार सायकलवर येत असल्याची माहिती डोणगाव येथील नागरिकांना कळल्यानंतर रस्त्यावर जमाव जमला होता.
या जमावाने पाठलाग करून त्या व्यक्तीला पकडून चोप दिला.
साडी घालून महिलेच्या वेशात आलेला हा व्यक्ती लहान मुलांना पळवत असल्याचा संशय आहे. मात्रतो व्यक्ती स्वतःला तृयीयपंथी सांगतो आहे.
याचा तपास पोलिस करत आहेत मात्र नागरिकांनी हा व्यक्ती मुलं पळवणारा असल्याचे सांगितले आहे.