जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी शिवसेना उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
आजपासून 3 नोव्हेंबरपर्यंत त्या मुंबई दौरा करणार आहेत.
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आणि नारायण राणेंचा मंत्री मंडळ प्रवेश यामुळे राज्यातील राकारण सध्या चांगलेच तापले आहे. यामुळे ममता बॅनर्जींच्या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.