लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथविधी घेणार आहे. 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीसाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थिती लावणार आहेत. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार.
या शपथविधीसाठी अनेक लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे.
मात्र मंगळवारी शपथविधीला हजेरी लावणार असे म्हणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसचे अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार टाकला आहे.
मी शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात अनेक लोकांनी जीव गमवला असल्याचे वृत्तसंस्थान दाखवत आहेत.
मात्र बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झाला नसून वैयक्तिक कारणावरून झाला असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे मोदीजी मला माफ करा मी काही शपथविधीला उपस्थिती लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.