लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएला जनतेने बहुमत दिले. देशभरात 542 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर 23 मे रोजी निकाल जाहीर झाला. एनडीए 354 जागेवर निवडून आल्यानंतर 30 मे रोजी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना भेटून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. यावेळी शपथविधीसाठी अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांच्यासह पश्चिम बंगाल येथील तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींना देखील निमंत्रित केले आहे.
30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत.
सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनाही निमंत्रित केले आहे.
त्याचबरोबर पश्चिम बंगाल येथील तृणमूल कॉंग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रण मिळाले आहे.
विशेश म्हणजे ममता बॅनर्जी शपथविधीला हजेरी लावणार असल्याचे समोर आले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकांमुळे तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपामध्ये तणावाचे वातावरण आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी बजावली असून एनडीएने 354 जागा जिंकल्या.
पश्चिम बंगालमध्ये सुद्धा यंदा अधिकाधिक जागा जिंकल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसला खत्रा दिसू लागला आहे.
मात्र मंगळवारी तृणमूल कॉंग्रेसचे 60 नगरसेवक आणि दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.
तसेच माकप पक्षाचे एक आमदार भाजपात प्रवेश केल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
यामध्ये मुकुल रॉय यांचे पुत्र सुभ्रांशू रॉय यांचाही समावेश आहे.
त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे म्हटलं जात आहे.
त्याचबरोबर ममता बॅनर्जी यावर भाजपाला काय उत्तर देतील ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.