जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
पावसाने कमबॅक करत जोरात बॅटिंग सुरु केली. माऴशेज घाट परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.
या पावसामुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला आहे. अतिवृष्टीमुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्य़ात येत आहे.
रस्ता खचल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे माळशेज परिसरात वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे विकेंडला माळशेज घाटात जाणाऱ्यांच्या
उत्साहावर काहीस विर्जण पडल आहे.