Malshej Ghat Accident: माळशेज घाटात भीषण अपघात! खडीच्या ढिगावर कार पलटी, पिकअपला जोरदार धडक; पाच जण गंभीर जखमी

माळशेज घाटात मध्यरात्री भीषण अपघात होऊन खडीच्या ढिगावर कार पलटी झाली आणि पिकअपला धडकली. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले.

Malshej Ghat Accident: माळशेज घाटात भीषण अपघात! खडीच्या ढिगावर कार पलटी, पिकअपला जोरदार धडक; पाच जण गंभीर जखमी

माळशेज घाट: कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. करंजाळे परिसरात रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावर खडीचा ढिग टाकला होता. मात्र, अंधारामुळे या ढिगाचा अंदाज न आल्याने भरधाव कार त्यावर चढली आणि पलटी होत समोर उभ्या असलेल्या पिकअप जीपवर आदळली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या अंगावर दारू ओतून पेटवलं; जळगावात थरकाप उडवणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. संबंधित कार घाटातून प्रवास करत असताना चालकाला रस्त्यावर टाकलेला खडीचा ढिग वेळेत दिसला नाही. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. त्यानंतर ती जवळच असलेल्या पिकअप जीपवर जाऊन आदळली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.

हेही वाचा: Pune Crime News: सैतानी कृत्याची परिसीमा! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक; लोहगावातील संतापजनक घटनेने सगळेच हादरले

घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातग्रस्त वाहनांमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नसला तरी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number