जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित जेलमधून आज बाहेर पडण्याची शक्यता आहे. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर कर्नल पुरोहित यांची सुटका होणार आहे.
कर्नल पुरोहित यांना आर्मी त्यांच्या सुरक्षा स्कॉडमधून पुण्याला घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे 1 लाख रुपयांची जामिनाची रक्कम
भरल्यानंतर तब्बल 9 वर्षांनी पुरोहित तुरुंगातून बाहेर येतील त्याचबरोबर तळोजा जेल मधून सुटका झाल्या नंतर कर्नल पुरोहित सेशन कोर्टात जातील अशी माहिती
सूञांकडुन मिळत आहे.