सात महिन्याच्या बाळाला दुध पाजत असणा-या आई सहीत गाडी टो केल्याप्रकरणात नवा ट्विस्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत सात महिन्याच्या बाळाला दुध पाजत असणा-या आई सहीत गाडी टो केल्याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकराला बळी पडलेल्या ज्योती माळी या आपली बाजू पोट तिडकीनं मांडत असल्या तरी राष्ट्रीय महिला आयोगानं मात्र त्यांच्यावरही कारवाईची मागणी केलीय. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांच्या मते आईमुळे बाळाच्या जीवालाही धोका निर्माण झाला, […]

सात महिन्याच्या बाळाला दुध पाजत असणा-या आई सहीत गाडी टो केल्याप्रकरणात नवा ट्विस्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत सात महिन्याच्या बाळाला दुध पाजत असणा-या आई सहीत गाडी टो केल्याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

या प्रकराला बळी पडलेल्या ज्योती माळी या आपली बाजू पोट तिडकीनं मांडत असल्या तरी राष्ट्रीय महिला आयोगानं मात्र त्यांच्यावरही कारवाईची मागणी केलीय.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांच्या मते आईमुळे बाळाच्या जीवालाही धोका निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांवर कारवाई कराच पण आईवरही गुन्हा दाखल करा असे त्यांचे म्हणणे आहे.

तर, टो प्रकरणात बाळ गाडीत नव्हतं. कारच्या बाहेर होत अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळली आहे. याचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय घडलंय नेमकं?

तान्ह्या बाळाला दुध पाजत असणा-या आई सहीत गाडीला टो करण्याचा प्रकार मालाडच्या एस.व्ही रोडवर घडलाय. आपल्या सात महिन्याच्या मुलीसहित ही महिला गाडीच बसली होती. मुलीची औषधं आणण्यासाठी तिचे वडील मेडीकल स्टोअरमध्ये गेले असता ही गाडी टोईंग करण्यात आली. मात्र, गाडीत कुणी आहे की नाही याची काहीही दखल न घेता गाडी ट्राफिक पोलीसांनी टो केलीय. ती महिला ओरडून पोलीसांना सांगत असतानाही पोलीसांनी तिचं म्हणणं ऐकून न घेता गाडी टो केलीय. या प्रकरणाची दखल मुंबई ट्राफिकच्या वरिष्ठ पोलीस अधिक-यांनी घेतलीय. यासंपुर्ण प्रकरणानंतर दोषी वाहतूक पोलिसाला निलंबीत करण्यात आलंय. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number