रेल्वे स्टेशनवर रील्स बनवताय? सावधान! होऊ शकतो तुरुंगवास आणि दंड

रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वे ट्रॅकजवळ अशी कृत्यं करणे केवळ धोकादायकच नाही, तर ती कायद्याने दंडनीय आहे.

रेल्वे स्टेशनवर रील्स बनवताय? सावधान! होऊ शकतो तुरुंगवास आणि दंड

मुंबई: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचं वेड इतकं वाढलं आहे की, अनेकजण  इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर प्रसिद्ध होण्यासाठी कुठेही आणि कसेही फोटो-व्हिडिओ शूट करतात. अनेक वेळा तर लोक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे प्लॅटफॉर्मवर, ट्रॅकच्या कडेला किंवा अगदी धावत्या ट्रेनजवळ रील्स बनवताना दिसतात. मात्र, रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वे ट्रॅकजवळ अशी कृत्यं करणे केवळ धोकादायकच नाही, तर ती कायद्याने दंडनीय आहेत. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, परवानगीशिवाय रेल्वे परिसरात फोटो किंवा व्हिडिओ शूट करणे हा गुन्हा मानला जातो. 

उत्तर पश्चिम रेल्वेने नुकत्याच एका ट्वीटद्वारे नागरिकांना सावध करत सांगितले की, रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 आणि 147 नुसार, रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मवर सेल्फी काढणे अथवा रील्स बनवणे यासाठी 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यामुळे, अशा कृत्यांपासून दूर राहणं फक्त कायद्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर तुमच्या सुरक्षेसाठीही आवश्यक आहे. रेल्वे वेळोवेळी नागरिकांना हे नियम आणि अपघातांची माहिती देत आली आहे, पण तरीही अनेकजण दुर्लक्ष करतात.

रेल्वे ट्रॅकजवळ रील्स शूट करताना किंवा फोटो घेताना अनेक दुर्दैवी अपघात घडले आहेत, ज्यात लोकांनी आपला जीव गमावला आहे. काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी आपल्या आणि इतरांच्या आयुष्याशी खेळू नका. रेल्वे प्रशासन अशा प्रकारांवर आता कडक पावलं उचलत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वे स्थानकावर गेल्यावर मोबाईलच्या कॅमेऱ्याऐवजी स्वतःच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करा – कारण एक चूक आयुष्यभराचं पश्चात्ताप बनू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number