‘कार्यकर्त्यांनो, कंगनाविरोधात तक्रारी करा’ – विजय वड्डेटीवार

  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत भारताच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाकडून टीकासत्र सुरू आहे. त्यातच आता काँग्रेस नेत्यांनी कंगना विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.   ‘देशाच्या स्वातंत्र्याची ओळख नसणारी अभिनेत्री कंगना राणावत ही देशद्रोही आहे. त्यामुळे तिच्या विरोधात ठिकठिकाणी पोलीस तक्रार दाखल करा’, […]

‘कार्यकर्त्यांनो, कंगनाविरोधात तक्रारी करा’ – विजय वड्डेटीवार

  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत भारताच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाकडून टीकासत्र सुरू आहे. त्यातच आता काँग्रेस नेत्यांनी कंगना विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

  ‘देशाच्या स्वातंत्र्याची ओळख नसणारी अभिनेत्री कंगना राणावत ही देशद्रोही आहे. त्यामुळे तिच्या विरोधात ठिकठिकाणी पोलीस तक्रार दाखल करा’, असे आवाहन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी रायगडमध्ये केले. काँग्रेस पक्षाच्या जाहीर मेळाव्यात बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य

  १९४७मध्ये देशाला स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य २०१४मध्ये मिळाले आहे, असे वक्तव्य कंगना राणावतने केले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तसेच भीक मिळते परंतु स्वातंत्र्य मिळत नाही, असे म्हणत कंगनाने महात्मा गांधीजींच्या अहिंसेची खिल्ली उडवली. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, याबाबतचे बरेच पुरावे आहेत. असे कंगनाने म्हटले आहे.

  कंगनाने  केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता कंगना राणावत वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तीच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number