Petrol LPG Supply: पेट्रोल आणि LPG च्या पुरवठ्याबाबत मोठी अपडेट; केंद्र सरकारने जनतेला केलं ‘हे’ आवाहन

मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Petrol LPG Supply: पेट्रोल आणि LPG च्या पुरवठ्याबाबत मोठी अपडेट; केंद्र सरकारने जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Petrol LPG Supply: मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने शनिवारी स्पष्टीकरण दिले असून, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा (LPG) पुरवठा सुरळीत असल्याचे आश्वस्त केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाची साठवणूक (Panic Buying) करू नये, असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाने केले आहे.

'होर्मुझ' संकट तरीही पुरवठा सुरक्षित
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) हा जागतिक तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग बंद होण्याची शक्यता असली, तरी सरकारने सक्रिय उपाययोजना केल्या आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "देशातील पेट्रोलियम उत्पादनांचा साठा पुरेसा असून पुरवठा साखळीत कोणताही व्यत्यय आलेला नाही. नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि ऊर्जेची बचत करावी."

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य आणि रिफिलिंग नियोजन
सरकारने घरगुती एलपीजी आणि पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) पुरवठ्यासाठी कुटुंबे, रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले आहे. वाढती मागणी लक्षात घेता रिफायनरींमधील उत्पादन वाढवण्यात आले आहे. तसेच, एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून घेण्याच्या (Refill) कालावधीत काही तांत्रिक बदल करून मागणीचे नियोजन केले जात आहे. शुक्रवारी एकाच दिवसात देशभरात सुमारे 51 लाख एलपीजी सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले, ज्यापैकी 95 टक्के बुकिंग ऑनलाइन झाले होते.

हेही वाचा – US-China Standoff: जागतिक व्यापारावर नवे संकट! हॉर्मुझनंतर आता 'या' कालव्यावरून अमेरिका-चीन आमनेसामने; भारताची चिंता वाढली

साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारचा बडागा
इंधन टंचाईच्या अफवांचा फायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध सरकारने कडक मोहीम उघडली आहे. आतापर्यंत देशभरात 3,700 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1,000 वितरकांना 'कारण दाखवा' नोटिसा बजावण्यात आल्या असून, 27 वितरकांचे परवाने (Dealers) तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत इंधनाची साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number